OZEE - Entertainment Now
Zee Marathi is now available on OZEE
Install

झी नाट्य गौरवाचो गाऱ्हाणा!

किसनदेव - इतक्या घाईन, खय चल्लस रे पेंद्या?

पेंद्या - देवा..माका एक अर्जंट काम इला असा..बाजूक रव्हा..

किसनदेव - इतका काय अर्जंट असा..माका सांग तरी..खय आग लागली की भूकंप इलो हा?

पेंद्या - तुमका सगळा आल्यावर सांगतंय..आता माका जाऊ दे..नायतर माझ्यामुळे पुरो कार्यक्रम खोळंबून रव्हतलो.

किसनदेव - कसलो कार्यक्रम?

पेंद्या – देवा, मका बोलावल्यानी असा झी मराठीवाल्यांनी..थय निघालंय..

किसनदेव - झी मराठीवाल्यांनी? कित्या रे? पांडू असा ना त्यांच्याकडे एक, मगे पेंद्या कित्याक व्हयो त्यांका?

पेंद्या - मालिकेत काम करुक नाय वो..गाऱ्हाणा घालूक जातंय..

किसनदेव - गाऱ्हाणा?

पेंद्या - झी नाट्य गौरवाचो पुरस्कार सोहळो असा ना..त्याच्या सुरवातीक गाऱ्हाणा घालूचा असा..

किसनदेव - वा!! मगे तुका सगळ्या कलाकारांका भेटूक मिळात ना? मजा हा मरे तुझी..

पेंद्या - कोणाक बोलू नको देवा, तुका म्हणून सांगतंय..माका पास मिळालो असा पहिल्या रांगेतलो..सचिन पिळगावकर असत ना, त्यांच्या बाजूची खुर्ची माझ्यासाठी फिक्स करून ठेवल्यानी असा त्यांनी. मी त्यांका म्हटलंय गाऱ्हाणा घालून मी निघतंलय, पण ते ऐकूक तयार नाय..माका बळजबरीन पहिल्या रांगेतली सीट दिल्यांनी..आता एवढो आग्रह झालो म्हणून मी पण मग म्हटलंय, करा तुमच्या मनासारखा..तसा आपणाक काय एवढो नाद नाय सिनेमाचो..

किसनदेव – माका घेऊन चलशील? माका बघुचे असत आपले मराठी कलाकार..

पेंद्या - इतका सोपा नाय ते देवा..कडक सिक्युरिटी असता थय. हा, आता माझ्याबरोबर इलास तर मग तुमका कोण थांबवनार नाय म्हना पन तरी, रिस्क हा थोडी..समजताहा ना तुमका?

किसनदेव - तुझो असिस्टंट म्हणान येतंय ना..तू गाऱ्हाणा घालशील ना, मगे तेवा मी आंब्याची पाना, इडो वैगेरे मांडून ठेवतंय, हवा असात तर माईक धरूक उभो राहतंय..चलतला? नायतर, तू गाऱ्हाणा बोल, मी मागसून होय महाराजा ओरडूक येतंय..

पेंद्या - असा तुमका येउक मिळूचा नाय देवा..मराठी नाटकांचो सर्वात मोठो गौरवसोहळो असा झी नाट्य गौरव आणि थयसर तुमी येऊन करतलास काय?

किसनदेव – माका सेल्फी काढूचे हत..

पेंद्या – तुमच्या मोबाईलला फ्रंट कॅमेरो खय असा?

किसनदेव - मागे हा ना कॅमेरो, फोन उलटो करून फोटो घेतलंय. ता सगळा रव्हांद बाजूक..पयला जाउचा कसा ते सांग..

पेंद्या - कन्हैया, तुझो खरंच ‘जेनयु’न प्रॉब्लेम झालो असा. करोडो रुपयांची कर्ज बुडवणारी माणसा आरामशीर देशातून पसार होतत, तुमका साधा हयसून एका सोहळ्याक येउक मिळणा नाय..माका खूप वाईट वाटता..मी कायतरी खटपट करतंय..तू भिया नको..

किसनदेव – माका माझे भूज’बळ’ वापरूक लागतला असं दिसता हा..

पेंद्या - तेवढा सोडून, कायव करा. त्या बळाचो वापर तुम्हाला तुमच्या जन्मस्थानी पाठवू शकता..कळता ना तुमका?

किसनदेव - मग मी माझी दिव्य शक्ती वापरतंय..

पेंद्या - ती कशी?

किसनदेव - मी पेंद्या बनतंय आणि तुला किस्ना बनवतंय..

पेंद्या - हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालो असा..मी असा होऊक देऊचंय नाय..

किसनदेव - ह्यात कसला आला अभिव्यक्ती स्वातंत्र्य..

पेंद्या - हल्ली अभिव्यक्ती स्वातंत्र्य खयव येता, म्हणान बोलालंय. तुमका राग इलो तर माका माफ करा..

किसनदेव – कायव हरकत नाही पेंद्या..तू जा नाट्य गौरवला..मनापासून गाऱ्हाणा घाल..मगे मका ते पोहचतला!

पेंद्या - मग देवा तुमचा काय? तुमका बघुक मिळणार नाय?

किसनदेव - असो काय म्हणतस..रविवार, १० तारखेक संध्याकाळी सात वाजता झी मराठीवर मी बघतंलय ना ‘झी नाट्य गौरव २०१६’ चो पुरस्कार सोह्ळो आणि कामानिमित बघुक मिळाला नाय, तर झी मराठीच्या वेबसाईट किंवा ओझी अॅपवर मिळतला बघुक. तू माझी काळजी करा नको रे..

पेंद्या - बरोबर हा..शेवटी ‘देवाक काळजी’, चला येतंय..आशीर्वाद देवा..

किसनदेव – सुखान रव्ह..

Latest Blog Posts

View All