OZEE - Entertainment Now
Zee Marathi is now available on OZEE
Install

सैराटच्या इंटरेस्टिंग गोष्टी!

सैराटच्या प्रोमोशनने सध्या जोर पकडला आहे. २९ एप्रिलला हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. 'फँड्री'ला मिळालेल्या सुसाट यशानंतर नागराज मंजुळे यांचा हा दुसरा चित्रपट. सैराटची चर्चा सध्या सगळीकडे ऐकायला मिळत आहे, पण सैराटच्या पडद्यामागील कधीही न ऐकलेल्या काही रंजक गोष्टी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.

जाणून घेऊया काय आहे, 'सैराट'बद्दलची इंटरेस्टिंग माहिती -

१. सैराटसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची नागराज मंजुळे यांनी चित्रपटासाठी निवड केली तेव्हा ती सातवी इयत्तेत शिकत होती.

२. चित्रपटातील जवळपास सगळीच गाणी संगीत दिग्दर्शक अजय गोगावले यांनी स्वतः लिहिली आहेत.

३. बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट म्हणून सैराटला मान मिळाला आहे.

४. सैराट हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे ज्याच्या गाण्यांची रेकॉर्डिंग भारताबाहेर नावाजलेल्या सिंफनी स्टुडीओत करण्यात आली आहे.

५. सैराटमध्ये नायकाची भूमिका वठवणारा आकाश ठोसर हा मुळात पेहलवान होता. चित्रपटासाठी त्याने वजन कमी केलं.

६. सिनेमा रिअल वाटावा म्हणून कोणताच सेट उभा न करता, गावातच शूटिंग केली.

७. सैराटची नायिका बिनधास्त वाटावी म्हणून नागराज यांनी रिंकूला बुलेट चालवण्यास शिकवले.

८. नागराज मंजुळे यांनी 'फँड्री'च्या प्रदर्शनानंतर महिन्याभराच्या आत 'सैराट'च्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली होती.

९. सैराट सिनेमाचा अभिनेता आकाश ठोसर हा सिनेमाचं शुटिंग संपेपर्यंत नागराज यांच्या घरी राहिला होता.

१०. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट..सैराट हा अस्सल मराठी शब्द असून त्याचा अर्थ सुसाट, वेगवान असा होतो, संत तुकारामांच्या अभंगांमध्ये सैराट शब्दाचा उल्लेख आला आहे.

अवघ्या महाराष्ट्राला मनोरंजनाची झिंग चढवण्यासाठी २९ एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय, सैराट!