OZEE - Entertainment Now
Zee Marathi is now available on OZEE
Install

प्राजक्ताचं 'प्लेझंट सरप्राइज'

दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांचे रंगभूमीकडे वळणं, हे आता नित्याचे झाले आहे. शशांक केतकर, तेजश्री प्रधान, सुयश टिळक, सुरुची अडारकर, ललित प्रभाकर यांच्या पंक्तीत आता एका नव्या अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहचलेली 'मेघना' म्हणजेच प्राजक्ता माळी आता लवकरच मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे.

सुयोग नाट्यसंस्थेची निर्मिती असलेल्या 'प्लेझंट सरप्राइज' या नाटकात प्राजक्ता चमकणार आहे. या नाटकात तिच्यासोबत मयुरी देशमुख, समीर खांडेकर आणि सौरभ गोखले या कलाकारांचा समावेश आहे. 'प्लेझंट सरप्राइज' या नाटकाचा विषय प्रेमावर आधारित आहे. प्रेमाचे वेगवेगळे पैलू या नाटकात पाहायला मिळणार आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे तर या नाटकाचे निर्माते संदेश भट हे आहेत.

प्राजक्ताचं हे 'प्लेझंट सरप्राइज' तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच सुखावणारं ठरेल यात शंका नाही. नवीन नाटकासाठी प्राजक्ताला झी मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा!